लखनऊ : मध्यरात्री घरात आवाज येऊ लागले की साहजिक भीती वाटते. अशाच एका घरात एका खोलीतून आवाज येऊ लागला. या खोलीत घरातील मुलगी राहत होती. मुलीच्या खोलीतून आवाज कसला येतो हे पाहायला म्हणून कुटुंबाने दरवाजा उघडून पाहिला आणि त्यांना धक्काच बसला. दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी लगेच दरवाजा बंद केला.
उत्तर प्रदेशमधील ही घटना आहे. हयातनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात मंगळवारी रात्री तरुणीच्या रूममधून तरुणाचा आवाज ऐकू येऊ लागला. मुलीच्या खोलीत मुलाचा आवाज ऐकल्यानंतर कुटुंबाने बाहेरून दरवाजा बंद केला. तसंच तरुणाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या लोकांमध्ये पंचायतीची फेरी सुरू झाली.
नेमकं प्रकरण काय?
या तरुण-तरुणीचं अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मंगळवारी रात्री हा तरुण गुपचूप तरुणीला भेटायला तिच्या घरी आला. पण त्याचा आवाज तिच्या कुटुंबाने ऐकला. तरुणाला तरुणीच्या नातेवाईकांनी पकडल्यानंतर दोन्ही बाजूचे लोक जमा झाले आणि पंचायत बसली. बुधवारी दुपारपर्यंत दोन्ही बाजूंमध्ये पंचायत फेरी सुरू होती, ज्यामध्ये दोन्ही बाजूच्या लोकांनी दोघांच्या लग्नावर सहमती दर्शवली. प्रेमीयुगुलाचं लग्न पंचायतीत मान्य झाल्यानंतर बुधवारी या दोघांचंही लग्न लावून दिलं. पण लग्नानंतर नवरदेवाच्या कुटुंबानं नवरीला सासरी नेलं नाही. 2 महिन्यांनंतर तिला घेऊन जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
गर्लफ्रेंडला भेटायला गेला आणि फसला
दरम्यान, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडविषयी अनेक निरनिराळ्या घटना समोर येत असतात. अनेकदा थक्क करणाऱ्या गोष्टी व्हायरल होतात. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. याआधी एक असा व्हिडीओ व्हायर झाला होता.
बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडला लपून छपून भेटायला गेला मात्र नंतर त्याच्यासोबत जे घडलं ते खूपच चकित करणारं होतं. त्याला तिच्या घरच्यांनी रंगेहाथ पकडलं आणि मुलीशी लग्न लावून दिलं. त्याला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं मात्र रंगेहाथ पकडल्यावर त्याला तिच्याशी लग्न करावं लागलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. sarif_video नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.