MNS जिल्हाध्यक्ष जयंतदादा चौव्हान यांच्या हस्ते कळमेश्वर तालुका नवनियुक्त कार्यकारणी जाहीर
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी जयंतदादा चव्हाण यांची नियुक्ती झाली तेव्हा पासून नागपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेने ला एकप्रकारची नवसंजीवनीच मिळाली आहे जिल्ह्यात मनसे संघठन नव्याने तयार करण्यारिता जयंतदादा चव्हाण यांनी अथक परिश्रम सरू केले आहेत यामध्ये मनसे नागपूर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात वाढविणार असल्याचे प्रस्तुत नागपूर क्रांती प्रतिनिधी यांच्याशी बोलताना आपले मत जयंत चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी जयंतदादा चौव्हान यांच्या हस्ते तसेच प्रमुख उपस्थितीत मध्ये खापरखेडा येथील जयंत चव्हाण यांच्या राजगड जनसंपर्क कार्यालय येथे सावनेर विधानसभा क्षेत्रातील कळमेश्वर तालुका कार्अयकारणीची घोषणा करून पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले कळमेश्वर तालुका अध्यक्ष पदी प्रफुल्ल धोटे, तालुका संघटक पदी दुर्गेश दिवाकर, तालुका उपाध्यक्ष पदी पवन इंगळे, यांची नियुक्ती करण्यात आली. यांत मनसे जिल्हाध्यक्ष जयंतदादा चौव्हान यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना मार्गदर्शक करीत पुढील कार्याकरिता व संघठन वाढविण्या करिता शुभेछा दिल्या
व हिदुजननायक राज ठाकरे साहेब यांचे ज्वलंत विचार तळागळा पर्यंत पोहचविण्याचे आह्वान केले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती दिलांश निकोसे, कुणाल मेश्राम, ओमकार देवगडे, फरीद शेख, चेतराम राउत व आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते….!