जयभोले नगर परिसरातील नागरिकांच्या घरात गुढघाभर पाणी
पहिल्याच पावसात पोटा-चनकापूर ग्रामपंचायतचे पितळ पडले उघड
खापरखेडा प्रतिनिधी :
शुक्रवारला खापरखेडा परिसरात जवळपास चार तास मुसळधार पावसाचे आगमन झाले मात्र पहिल्याच पावसात पोटा चनकापूर ग्रामपंचायतीचे पितळ उघडे पडले असून पहिल्याच पावसात वार्ड क्रमांक १ परिसरातील नागरिकांच्या घरात गुढघाभर पाणी शिरले आहे त्यामूळे एकच तारांबळ उडाली असून सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्यांचा अभाव असल्यामूळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी जयभोले नगर वास्तव्यास आहे वार्ड क्रमांक १ परिसरातील काही भागात सिमेंट रोड, सांडपाणी वाहून नेण्यासाठी न्याल्या व सोयीसुविधाचा अभाव आहे यासंदर्भात येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत मात्र दुर्लक्ष करण्यात आले २८ जून शुक्रवारला सकाळच्या सुमारास जवळपास चार तास मुसळधार पाऊस पडला त्यामूळे वार्ड क्रमांक १ परिसरातील नागरिकांच्या घरात गुढघाभर पाणी शिरले.
या परिसरात हसनूर कान्वेंट, उद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्वरमुद्रा म्युझिक अकॅडमी सह अनेक संस्था कार्यरत आहे त्यामूळे या परिसरात विद्यार्थ्यांची सारखी वर्दळ असते शिवाय या परिसरात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे पहिल्याच पावसात घरासह रस्तावर गुढघाभर पाणी साचल्यामूळे मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत त्यामूळे पोटा चनकापूर ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन उपाययोजना कराव्या अशी मागनी वार्ड १ परिसरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात पोटा चनकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच पवन धुर्वे यांच्याशी संपर्क केला असता काही नागरिकांनी नाली बांधकामा करिता रितसर जागा सोडली नाही त्यामूळे अडचण निर्माण झाली आहे २८ जून शुक्रवारला झालेल्या मासिक सभेत सदर विषयावर चर्चा करण्यात आली लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल असे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.