“लाडली बहिण योजना” अमलबजावणी करण्याकरिता प्रशासन सज्ज
उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी घेतला आढावा – वानखेडे आपले सरकार सेवा केंद्र सेतु येथे भेट दिली
खापरखेडा-प्रतिनिधी ; मध्य प्रदेश सरकारने “लाडली बहना” योजना सुरू केली याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली सदर योजनेच्या अंमलबजावणी साठी प्रशासन सज्ज झाले आहे नुकतेच सावनेर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी आपले सरकार सेवा केंद्र व ग्रामपंचायत भेट देऊन आढावा जाणून घेतली आहे.
राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी “मुख्यमंत्री लाडली बहीण योजना” ची घोषणा केली या योजनेचा लाभ २१ ते ६० वर्ष वयोगटातील लाभार्थी महिलांना होणार असून दरमहा १ हजार ५०० रुपये महिना मिळणार आहे सदर योजनेला लाभार्थी महिला वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत असून राज्यातील अनेक सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयात लाभार्थी महिला गर्दी करीत आहेत.
सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघाच्या शेवटच्या टोकाला भानेगाव, चिचोली, खापरखेडा, चनकापूर, पोटा, सिल्लेवाडा, रोहना वलनी आदी गावे आहेत मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे त्यामूळे सेतू केंद्रासह ग्रामपंचायत व तहसिल कार्यालयात शेकडोच्या संख्येत महिला गर्दी करताहेत लाभार्थी ब महिलांची नोंदणी झाल्यानंतर यादी जारी केली जाणार आहे मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री लाडली बहीण योजना” सुरू केली सदर योजनेचा मध्यप्रदेश सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला मात्र, महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला किती फायदा होईल हे वेळेचं सांगणार आहे.
सदर योजनेबाबत काही महिलावर्गात अजून पुरेशी स्पष्टता नाही. त्यामुळे महिलावर्गात काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे सावनेर तालुक्यात महाराष्ट्र शासनाने ठरवून दिल्या नियमाप्रमाणे सुरू आहे किंवा नाही याची चौकशी व आढावा घेण्याकरिता सावनेर 5तालुक्याचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार मालिक विराणी यांनी १३ जुलै शनिवारला ग्रामपंचायत चिचोली (खापरखेडा) व पोटा (चनकापुर) व वानखेडे आपले सरकार सेवा केंद्र सेतु येथे भेट दिली यावेळी सदर योजनेबाबत मार्गदर्शन केले यावेळी ग्रामपंचायत मार्फत लाभार्थी महिलांचे अर्ज स्वीकारण्याचे आव्हान केले यावेळी सरपंच पवन धुर्वे व तलाठी निकेश मोहितकर उपस्थित होते.