लँडिंगवेळी इंडिगो विमानात विचित्र घटना; हवेत असतानाच ढसाढसा रडू लागले प्रवासी, काय घडलं?

जयपूर : एखादं विमान हवेत असताना त्यात अनेकदा टर्ब्युलन्स असतं. ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु कधीकधी ती खूप भीतीदायक देखील होते. त्यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांची अवस्था बिकट होते. असंच दृश्य इंडिगोच्या जोधपूर ते जयपूरच्या फ्लाइटमध्ये पाहायला मिळालं. येथे प्रवासी हवेतच रडायला लागले. हे प्रकरण इंडिगोच्या जोधपूर ते जयपूर फ्लाइट 6E-7406 शी संबंधित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान उतरू शकलं नाही. जयपूर विमानतळावर विमान उतरवण्यात अडचण आली. अशा स्थितीत विमान 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ हवेत फिरत राहिलं. यावेळी विमानात बसलेले प्रवासी चांगलेच घाबरले. विमानात गोंधळ झाल्याने प्रवासी घाबरले. एअर टर्ब्युलन्समुळे काही प्रवासी रडायला लागले. फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांनी दावा केला, की त्यांनी विमानात असा टर्ब्युलन्सयापूर्वी कधीही पाहिला नव्हता. आकाशात विमान स्थिर दिसत नसल्याने प्रवासी भयभीत झाले होते.

Weather Update : धोक्याचा इशारा! आज राज्यात अतिमुसळधार पाऊस, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

हा टर्ब्युलन्स इतका जोरात होता की, प्रवाशांच्या ऑक्सिजनच्या बॅगही खाली आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, विमान जयपूर विमानतळावर सुखरूप उतरलं तेव्हाच प्रवाशांच्या जीवात जीव आला, असा दावा विमानात उपस्थित प्रवाशांनी केला आहे. त्याचवेळी हे विमान नियोजित वेळेच्या पाच तासांनंतरही उड्डाण करू शकलं नाही. इंडिगो फ्लाइट 6E-7406 जोधपूरहून सकाळी 11:05 वाजता उड्डाण करणार होती आणि 1 तास 15 मिनिटांनी 12:20 वाजता जयपूरला पोहोचणार होती. पण, खराब हवामानामुळे विमानाने जोधपूरहून दुपारी 12:02 वाजता उड्डाण घेतलं. दुपारी 1:42 वाजता विमान जयपूर विमानतळावर उतरलं. यावेळी विमान जयपूरच्या आकाशात 25-30 मिनिटं फिरत राहिलं

टर्ब्युलन्स हा खरं तर एक अस्थिर वारा आहे ज्याचा वेग आणि वजन सांगता येत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे फक्त खराब हवामान किंवा वादळातच घडतं. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सर्वात धोकादायक टर्ब्युलन्स तेव्हा होतो जेव्हा हवामान स्वच्छ असतं आणि आकाशात कोणताही धोका किंवा सिग्नल दिसत नाही. स्वच्छ हवेमध्ये, उच्च उंचीवर असलेल्या हवेच्या प्रवाहांमध्ये अनेकदा टर्ब्युलन्स येतो, ज्याला जेट स्ट्रीम म्हणतात. असं घडतं जेव्हा दोन वायु प्रवाह एकमेकांभोवती वेगवेगळ्या वेगाने वाहतात. जर वेगातील फरक खूप जास्त असेल तर वातावरण त्याचा दाब हाताळू शकत नाही आणि हवेचे प्रवाह दोन भागात विभागले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

Read More

Recent Posts