जयपूर : प्रेमाचं एक अतिशय अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. प्रेम कधी, कोणावर आणि कसं होईल हे कोणीही सांगू शकत नाही. या जोडप्यासोबतही असंच घडलं. या जोडप्याने सगळी नाती बाजूला ठेवत एकमेकांवर प्रेम केलं. यात एक मेहुणी तिच्या चुलत बहिणीच्या नवऱ्याच्या म्हणजेच दाजीच्याच प्रेमात पडली. दाजीचंही मेहुणीवर प्रेम जडलं. दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली. 20 वर्षांच्या मेहुणीचा दावा आहे, की तिच्या बहिणीला यावर कोणताही आक्षेप नाही. मात्र या नात्यावर समाज आणि घरच्यांचा आक्षेप होता. त्यामुळे त्यांना धमक्या येऊ लागल्या. घटना राजस्थानच्या चूरू येथील आहे.
चुरूच्या चालकोई गावातील पूजाने सांगितलं की, तिने 12वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. तिची चुलत बहीण बनारसी हिचा विवाह सुरेंद्रसोबत आठ वर्षांपूर्वी झाला होता. तिची बहीण आणि दाजी सुरेंद्र यांनाही 3 मुलं आहेत. सुरेंद्र गेल्या 13 महिन्यांपासून कामानिमित्त परदेशात राहत होता. नुकतीच चार महिन्यांची रजा घेऊन तो गावी आला होता. पूजा सांगते की, ती तिचा दाजी सुरेंद्र याला तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाच्या आधीपासून ओळखते.
रिल्सच्या नादात भरकटली तरुणाई! पुण्यातल्या तरुणीचा जीवघेणा स्टंट, पाहूनच येईल अंगावर काटा
दोघेही गेल्या तीन वर्षांपासून मोबाईलवर बोलत होते. तिचं दाजीवर प्रेम आहे. दाजीही तिच्यावर खूप प्रेम करतो. पूजाने सांगितलं की, तिला फक्त सुरेंद्रसोबत राहायचे आहे. सुरेंद्रलाही तेच हवे आहे. परदेशातून परतल्यानंतर दीड महिन्यापूर्वी 27 एप्रिल रोजी दोघेही घराबाहेर पडले. दोघेही चुरू, जयपूर आणि दिल्लीमार्गे गुजरातमधील वडोदरा येथे पोहोचले. त्यांनी तिथे बराच वेळ एकत्र घालवला. आता दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत
पूजा सांगते की, तिच्या बहिणीला या नात्यावर कोणताही आक्षेप नाही. सुरेंद्रही दोघींना एकत्र ठेवण्यास तयार आहे. तिने सांगितलं की तिच्या चुलत बहिणीला मालमत्तेत तिचा वाटा हवा आहे. याशिवाय तिला त्यांच्या नात्यावर कोणताही आक्षेप नाही. पण समाज आणि घरच्यांना हे पटत नाही. त्यांना धमक्या येत आहेत. भविष्यात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये. त्यामुळे ते पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरक्षा मागण्यासाठी आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.