बांधकाम मजूर नोंदणी अर्ज वानखेडे आपले सरकार सेवा केंद्र कोरडी रोड खापरखेडा येथून संपर्क करून भरू शकता
बांधकाम कामगार नोंदणी
- सन २००१ च्या जनगणनेनुसार राज्यात एकुण सुमारे १४.०९ लाख इतके बांधकाम कामगार आहेत. तथापीअधिकृत आकडेवारी जाहीर झाली नाही. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत १५.९९% झालेली वाढ विचारात घेता ढोबळमानाने बांधकाम कामगारांची संख्या १७.५० लाख इतकी अपेक्षित आहे.
- राज्यात नोव्हेंबर २०१६ अखेर ५.६२ लाख बांधकाम कामगारांची लाभार्थी म्हणून मंडळात नोंदणी झाली असून त्यातील २.९९ लाख कामगारांची नोंदणी जीवित आहे.
- महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, २०१५-१६ मधील माहितीनुसार राज्यात १.०२ लाख बांधकाम आस्थापना अस्तित्वात आहेत.
- स्वयंपूर्ण त्रिपक्षीय मंडळ दि. ०१.०५.२०११ रोजी स्थापन झाल्यानंतर दि. ०३.११.२०११ रोजी लाभार्थ्याकडून अंशदान घेण्याबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात आली
- तद्नंतर कामगारांची नोंदणी प्रक्रिया कामगार आयुक्त कार्यालयातील उपलब्ध मनुष्यबळाद्वारे लागलीच सुरु करण्यात आली.
नोंदणी पात्रता निकष
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
- मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…
- वयाचा पुरावा
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा
- ओळखपत्र पुरावा
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
आपण बांधकाम मजूर नोंदणी अर्ज वानखेडे आपले सरकार सेवा केंद्र कोरडी रोड खापरखेडा येथून संपर्क करून भरून भरू शकता