नवी दिल्ली : नीट परीक्षेत पेपर लीक झाल्याप्रकरणी संतप्त विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं असून विद्यार्थ्यांनी न्याय मिळावा यासाठी तीव्र निषेध केला आहे. दुसरीकडे पेपर लीक प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेल्या नितीश कुमार आणि अमित आनंद यांनी पेपर लीक झाल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी एकूण चार जणांनी पेपर लीकची कबुली दिली आहे.
NEET चं नाही तर याआधीही मी पेपर लीक करत होतो असं त्याने कबुली दिली आहे. मी वैयक्तिक कामानिमित्ताने सिकंदरला भेटायला गेलो होतो. त्यावेळी माझ्यासोबत नितीश कुमार देखील होता. आम्ही दोघंही तिथे आमचं काम करत असताना पेपर लीक करत असल्याचं सांगितलं. त्यावेळी सिकंदरने सांगितलं की त्याच्याकडे NEET ला बसलेले तीन ते चार विद्यार्थी आहेत. सिकंदरची पोलखोल झाल्यानंतर आम्ही सगळेच अडकणार याची आम्हाला कल्पना होता.
अमितने आपल्या गुन्ह्याची कबुली देताना महत्त्वाचे खुलासे केले आहेत. मी कोणत्याही दबावाशिवाय आणि भीती न बाळगता या सगळ्या गोष्टींची कबुली देत आहे. दानापूर महानगरपालिका कार्यालयात कनिष्ठ अभियंता असलेल्या सिकंदरशी माझी मैत्री होती. काही वैयक्तिक कामानिमित्त मी त्याला भेटायला गेलो होतो.
सिकंदरसोबतच्या भेटीत नितीशकुमारही माझ्यासोबत होता. मी सिकंदरला सांगितले की मी कोणत्याही स्पर्धा परीक्षेचे पेपर लीक करून उमेदवारांना चांगल्या मार्काने पास करतो. यावर सिकंदरने मला सांगितले की, माझ्याकडे 4-5 विद्यार्थी आहेत जे NEET परीक्षेची तयारी करत आहेत, तू त्यांना प्लीज पास कर अशी रिक्वेस्ट त्याने केली.
मुलांना उत्तीर्ण करण्याच्या बदल्यात मी 30-32 लाख रुपये लागतील असं सांगितलं. यावर सिकंदरने होकार दिला आणि सांगितले की, तो आम्हाला 4 उमेदवारांची नावे देईल. दरम्यान, NEET परीक्षेची तारीख आली. सिकंदरने मुलांना कधी आणायचे विचारले. मी म्हणालो की परीक्षा 5 मे रोजी आहे. 4 मे रोजी रात्री उमेदवारांना घेऊन या. 4 मे च्या रात्री NEET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि त्या विद्यार्थ्यांना सर्व उत्तर सांगून, पाठ करून परीक्षा देण्यासाठी पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.