धक्कादायक! विषारी दारु प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू, 60 जणांवर उपचार सुरू

कल्लाकुरिची : जळगावात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. दारु प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दारू विषारी असल्याचं तपासातून समोर आलं आहे. विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला, तर 60 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी अवैध दारू तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींकडून 200 लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली. तपासणी केली असता दारूमध्ये घातक मिथेनॉल आढळून आलं, हे मद्यपींच्या जीवावर बेतलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला. अशा प्रकारे अवैध दारू विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उशीर का झाल्या याची चौकशी करण्यात येईल. त्यांना पाठिशी घालणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जर अशा प्रकार अवैध दारू विकणाऱ्यांची माहिती मिळाली तर त्याची सूचना पोलिसांना द्यावी असं आवाहनही त्यांनी ट्विट करुन केलं आहे.

राज्यपालांनीही कल्लाकुरिचीमध्ये झालेल्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले असून अशा घटना ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे. अशी प्रकरणे राज्यात वेळोवेळी समोर येत आहेत. त्यामुळे आता तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री काय कठोर पावलं उचणार याकडे स्थानिकांचं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

Read More

Recent Posts