नवी दिल्ली : ट्रेनने प्रवास करणाऱ्या बहुतेक लोकांना त्यांनी सोबत काय घेऊन जावं आणि काय घेऊ नये हे माहित असतं. याबाबत रेल्वेकडून वेळोवेळी सूचनाही दिल्या जातात. पण आता एका 26 वर्षीय महिला प्रवाशाचं मोठं कांड पकडलं गेलं. ती इलेक्ट्रिक किटलीमध्ये असं काही घेऊन जात होती की पाहताच पोलीसही शॉक झाले. तिने किटलीमध्ये अशी गोष्ट लपवून ठेवली होती, ज्याची कल्पनाही पोलिसांनी केली नसेल.
समरीन अख्तर नावाची ही महिला मूळची पश्चिम बंगालची असून, ती सध्या बंगळुरूमध्ये राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समरीन काही दिवसांपूर्वी दिल्लीत आली होती. इथून काही सामान घेऊन तिला केरळला पोहोचायचं होतं. तिच्याकडे सुटकेस आणि बॅग होती. ती सामानासह ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये चढली आणि एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथे पोहोचली. रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर ती वेटिंग रूममध्ये गेली. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा महिलेला धक्काच बसला.
नंतर, जेव्हा पोलिसांनी बॅग उघडली तेव्हा त्यात एक इलेक्ट्रिक वॉटर हीटर होता. ज्यामध्ये 1 किलोपेक्षा जास्त MDMA म्हणजेच एक प्रकारचं ड्रग (मेथिलेनेडिओक्सिमथाम्फेटामाइन) ॲल्युमिनियम फॉइलमध्ये लपवल होतं. ते ठेवण्यासाठी, हीटरची हीटिंग कॉइल आणि इतर गोष्टी काढून टाकण्यात आल्या, जेणेकरून ते ओळखता येऊ नाही.
दिल्लीला जाणाऱ्या विमानात प्रवाशानं केलं ‘हे’ कृत्य; लँडिंगनंतर प्रवाशाला अटक
पोलिसांनी तातडीने महिलेला ताब्यात घेतलं. तिने हे ड्रग्ज 10 ग्रॅम वजनाच्या छोट्या पाऊचमध्ये विकायचं असल्याचं सांगितलं. प्रत्येक पाऊचची किंमत सुमारे 3000 रुपये होती. महिलेकडे एकूण सुमारे 50 लाख रुपयांचा ऐवज सापडला आहे. विक्रेते हे एक किलो ड्रग्ज कोट्यवधी रुपयांना विकणार होते. महिलेनं दिल्लीतील एका पुरवठादाराकडून ते खरेदी केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. यानंतर एर्नाकुलम पोलीस दिल्लीत पोहोचले आहेत. जेणेकरून ते त्याच्या संपूर्ण लिंकची चौकशी करू शकतील. नायजेरियातील काही लोक दिल्लीमार्गे संपूर्ण देशात व्यवसाय करत असल्याचं बोललं जात आहे.
केरळ पोलिसांनी सफीर नावाच्या मल्याळीला ताब्यात घेतलं आहे. समरीन अख्तर या व्यक्तीला 1 किलो एमडीएमए देणार होती. समीरच्या अटकेची माहिती नसताना अलुवा येथील स्टेशनवर सफीर थांबला होता. सरमीनविरुद्ध कलामासेरी पोलीस ठाण्यात आणखी एक अंमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल झाल्याचं तपासात समोर आलं आहे. नार्कोटिक सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ती प्रेशर कुकर आणि स्वयंपाकघरातील इतर भांड्यांमध्ये एमडीएमए ठेवण्यासाठी ओळखली जाते.
संशय येऊ नये म्हणून ड्रग्ज तस्कर महिलांची निवड करतात. कारण पोलीस अशा लोकांना शक्यतोपकडत नाहीत. समरीनने चांगला पेहराव केला होता आणि तिच्या वागण्याने कोणताही संशय निर्माण झाला नाही. तिच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तिने कबूल केलं, की ती ड्रग्ज घेऊन गेली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.