दिल्लीला जाणाऱ्या विमानात प्रवाशानं केलं ‘हे’ कृत्य; लँडिंगनंतर प्रवाशाला अटक

नवी दिल्ली : लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट वगैरे चित्रपटांमध्येच नसतं, तर प्रत्यक्ष आयुष्यातही त्याचा अनुभव येऊ शकतो; मात्र ते व्यक्त करताना आजूबाजूच्या परिस्थितीचं भान राखलं नाही, तर विचित्र परिस्थिती उद्भवते. व्हिएतनाममधल्या हो ची मिन्ह शहरातून नवी दिल्लीला येणाऱ्या विमानात एका प्रवाशाला लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइटची अनुभूती झाली; पण त्यानं जे केलं त्यामुळे अखेर त्याला अटक करण्याची वेळ आली.

व्हिएतनाममधल्या हो ची मिन्ह शहरातून विमानानं टेकऑफ केल्यावर एका प्रवाशाचं एअर होस्टेसवर प्रेम जडलं; मात्र तिच्याकडे प्रेम व्यक्त करण्याच्या नादात त्यानं जे केलं त्यामुळे त्यानं एअर होस्टेसची नाराजी ओढवून घेतलीच, शिवाय विमानातले नियमही मोडले.

व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहरातून VJ-895 हे विमान संध्याकाळी 7.25 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघालं होतं. विमानानं टेकऑफ केल्यावर काही वेळातच विमानात गोंधळाची परिस्थिती उद्भवली. विमानातल्या एका प्रवाशाचा एका एअर होस्टेसवर जीव जडला होता. गुरमितसिंग असं त्याचं नाव असून तो बराच वेळ त्या एअर होस्टेसकडे एकटक पाहत होता. नंतर त्यानं काही कारण सांगून एअर होस्टेसला जवळ बोलावलं व तिच्याशी बोलणं सुरू केलं.

एअर होस्टेसनं कामाचा भाग म्हणून प्रवाशाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं. प्रश्नांची उत्तरंही दिली; मात्र त्यानंतर गुरमितसिंग याने इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू केल्या. मग मात्र एअर होस्टेसनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा आपल्या मनातली गोष्ट एअर होस्टेसला सांगण्याचा त्यानं निर्धार केला व तिला जवळ बोलावून सांगून टाकलं; मात्र त्या वेळी एअर होस्टेसनं गप्प राहून केवळ नजरेतून नकार व्यक्त केला; मात्र यामुळे त्या प्रवाशाचा गोंधळ झाला व त्याला तो होकार वाटला. त्याने एअर होस्टेसचा हात पकडला. एअर होस्टेसनेही संयम ठेवून त्या प्रवाशाला असं काही न करण्यास बजावलं; मात्र गुरमितसिंगनं ऐकलं नाही. त्यानंतर त्यानं जे केलं त्यामुळे विमानातले सगळे कर्मचारी गोळा झाले.

गुरमितसिंगने त्या एअर होस्टेसला किस केलं. त्यावर नाराज झालेल्या एअर होस्टेसने विमानातल्या सहकाऱ्यांना बोलावलं. हा प्रकार पाहून प्रवासीही हवालदिल झाले. घडलेला प्रकार वैमानिकाला कळवण्यात आला. वैमानिकानं त्याबाबत दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या माध्यमातून एअरलाइन सिक्युरिटी, सीआयएसएफ आणि इतर सुरक्षा यंत्रणांना कळवलं.

या प्रकारानंतर सीआयएसएफच्या कमांडोंचं एक पथक आणि एअरलाइन सिक्युरिटीचे कर्मचारी एअरोब्रीजवर पोहोचले. रात्री 11 च्या सुमारास ते विमान दिल्ली विमानतळावर पोहोचलं. त्यानंतर लगेचच आरोपी गुरमितसिंग याला ताब्यात घेण्यात आलं. एअर होस्टेसने लेखी तक्रार दिल्यानंतर विमानतळ पोलिसांनी गुरमितसिंग याला अटक केली.

विमानातल्या प्रवाशाच्या या कृत्यामुळे दिल्ली विमानतळावर त्याला अटक करण्यात आली. एअर होस्टेसने लेखी तक्रार दिल्यामुळे विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी हे पाऊल उचललं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

Read More

Recent Posts