पंजाब नॅशनल बँकेतील ‘ही’ खाती आता बंद होणार, बँकेची ग्राहकांना नोटीस

नवी दिल्ली : काही कामानिमित्तानं बँकांमध्ये खाती उघडली जातात, पण अनेक खाती सांभाळणं जिकीरीचं काम असतं. काही वेळा ग्राहकांना फारशा वापरात नसलेल्या बँक खात्यांचा विसरही पडतो. पंजाब नॅशनल बँकेनं अशी सक्रिय नसलेली बचत खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या ग्राहकांना अशी खाती सुरू ठेवण्याकरता 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
वापरात नसलेली बँकेची खाती कालांतराने बँकांद्वारे बंद केली जातात. पंजाब नॅशनल बँकेनंही अशी बचत खाती बंद करण्याचा निर्णय घेतलाय. अशा बँक खात्यांचं केवायसी करण्याची नोटिस बँकेनं ग्राहकांना पाठवली होती. ग्राहकांना 30 जूनपर्यंत ही मुदत वाढवली आहे. त्यानंतर ही खाती बंद होणार आहेत.

पंजाब नॅशनल बँकेतील ज्या बचत खात्यांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये कोणताही व्यवहार झालेला नाही. तसंच ज्या खात्यांमधील बॅलन्स गेल्या तीन वर्षांपासून शून्य रुपये आहे. अशी खाती बँक बंद करणार आहे. अशा खातेधारकांना बँकेनं नोटिस पाठवली आहे. नोटिस पाठवल्यावर एक महिन्यानं ते खातं बंद होईल. खातेधारकांना त्यांचं खातं सुरू ठेवायचं असेल, तर त्यांनी बँकेत जाऊन केवायसी पूर्ण करणं जरूरी आहे.

Income Tax : ITR भरताय थांबा! जुना की नवीन नक्की तुमच्यासाठी कोणता योग्य?

बँकेतील जी खाती सक्रिय नसतात, अशा खात्यांचा घोटाळेबाजांकडून गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे बँकेनं अशी खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहेत 30 एप्रिल 2024 मधील आकडेवारीनुसार बँकेनं अशी खाती बंद करण्याचा निर्णय घेतलाय. काही कारणामुळे बँक खातं बंद झालं व ग्राहकांना ते पुन्हा सुरू करायचं असेल, तर बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागेल. तसंच आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तताही करावी लागेल. यामुळे बँक खातं पुन्हा सुरू होऊ शकतं. याबाबत बँकेत जाऊन अधिक माहिती मिळवता येऊ शकते.
पंजाब नॅशनल बँकेनं बचत खात्यांबाबत लागू केलेला नियम डीमॅट खात्यांबाबत लागू केलेला नाही. त्याशिवाय सुकन्या समृद्धी योजना (SSY), पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना (PMJJBY), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना (APY) अशा योजनांसाठी उघडलेली ग्राहकांची खातीही बँक सुरू ठेवणार आहे. त्याशिवाय मायनर सेव्हिंग अकाउंटही सुरू राहणार आहेत. सोशल मीडियावर बँकेनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तसं म्हटलंय.

पंजाब नॅशनल बँकेत असलेलं खातं जर सक्रिय नसेल, गेल्या तीन वर्षांमध्ये त्या खात्यात कोणतेही व्यवहार झाले नसतील, तसंच खात्यात पैसे नसतील तर अशी खाती आता बँक बंद करणार आहे. ज्यांनी ही खाती सुरू ठेवायची आहेत, अशा खातेधारकांनी बँकेत जाऊन केवायसी पूर्ण करणं महत्त्वाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

Read More

Recent Posts