हृदयद्रावक! रुग्णालयात पत्नीचा मृत्यू; पाहताच IPS अधिकाऱ्याने तिथेच संपवलं आयुष्य

नवी दिल्ली : आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांच्या पत्नीचं मंगळवारी प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर गुवाहाटी येथील एका खासगी रुग्णालयात शिलादित्य यांनीही आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. राज्याचे गृहसचिव म्हणून पोस्टिंग येण्यापूर्वी चेतिया यांनी तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) आणि आसाम पोलिसांच्या चौथ्या बटालियनचे कमांडंट म्हणून काम केलं होतं. चेतिया यांच्या पत्नीला ब्रेन ट्युमरचा त्रास होता आणि गेल्या काही महिन्यांपासून त्या रुग्णालयात दाखल होत्या.

चेतिया 2009 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी असून त्यांनी कथितपणे अतिदक्षता विभागात (ICU) त्यांच्या अधिकृत रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. जिथे पत्नीचा मृत्यू झाला, तिथेच त्यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

खरं प्रेम! पत्नीच्या मृत्यूनंतर लगेचच पतीनेही सोडले प्राण, सोबतच घेतला जगाचा निरोप

नेमकेअर हॉस्पिटलचे संचालक हितेश बरुआ यांनी सांगितलं की, “अधिकाऱ्याच्या पत्नीवर कॅन्सरचे उपचार सुरू होते आणि तिची प्रकृती खालावत चालली होती. चेतिया यांना याची माहिती देण्यात आली होती. मात्र संध्याकाळी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.”

उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सने सांगितलं, की चेतिया यांनी म्हटलं होतं की त्यांना त्यांच्या पत्नीच्या मृतदेहासोबत काही काळ एकटं सोडावं. कारण त्यांना प्रार्थना करायची होती. मात्र, अचानक आम्हाला गोळ्यांचा आवाज आला आणि आम्ही परत आत आलो. तेव्हा चेतिया यांनी स्वतःवर गोळी झाडल्याचं दिसलं. रुग्णालयातील स्टाफने सांगितलं की, आम्ही त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी लागून गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

Read More

Recent Posts